महाविकास आघाडी सरकारचा फडणवीस सरकारला आणखी धक्का
महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. विविध समित्यांवरील अशासकीय नियुक्त्या रद्द केल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. राज्यातील जिल्हा आणि तालुका दूध संघावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या आता रद्द झाल्या आहेत.
दूध संघावर फडणवीस सरकारने २६ अशासकीय सदस्य नियुक्त केले होते. अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील सल्लागार आणि दक्षता समित्यांवरील नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
अन्न नागरी पुरवठा विभागातील चार जणांच्या अशासकीय नियुक्त्या आणि दर नियंत्रण समितीवरीलही चार सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.